महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ
महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाची स्थापना १९७१ साली करण्यात आली. हातमाग महामंडळाचा मुख्य उद्देश म्हणजे महाराष्ट्रातील पारंपरिक हातमाग व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी सामाजिक दृष्टिकोनातून हातमाग उद्योग सजीव ठेवणे, कुशल विणकरांनी तयार केलेल्या उच्च दर्जाच्या कापडाची ओळख जपणे आणि कुशल विणकरांना रोजगार उपलब्ध करून देणे होय.