बंद

  विभागाविषयी

  वस्त्रोद्योग विभाग, महाराष्ट्र शासन हा सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या अखत्यारीत येत असून राज्यातील वस्त्रोद्योगाचा विकास आणि वस्त्रोद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी उत्तरदायी आहे. महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग उत्पादनांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि उद्योगात रोजगाराच्या संधी निर्माण करणाऱ्या योजना आणि कार्यक्रमांच्या अंमलबजावणीमध्ये विभागाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. पारंपारिक आणि आधुनिक वस्त्रोद्योग उपक्षेत्रांच्या मजबूत उपस्थितीसह महाराष्ट्रातील वस्त्रोद्योगाचा आणखी विकास करण्यासाठी विभाग कटिबद्ध आहे आणि राज्याला वस्त्रोद्योगाचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

  नागपूर येथे स्थित असलेले वस्त्रोद्योग आयुक्तालय आणि रेशीम संचालनालय या क्षेत्रीय कार्यालयाद्वारे विभागाला सहाय्य केले जाते. महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ, महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ ही तीन महामंडळे आहेत, जी महाराष्ट्रात वस्त्रोद्योगाच्या विकासात महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. याव्यतिरिक्त, वस्त्रोद्योग विभाग आणि वस्त्रोद्योग घटक यांच्यातील दुवा म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघ मर्या. ची महत्वाची भूमिका आहे.

  वस्त्रोद्योग हा महाराष्ट्रातील आर्थिक वाढीचा प्रमुख प्रचालक असून येत्या काही वर्षातही त्याची वाढ होत राहण्याची अपेक्षा आहे. राज्य सरकार उद्योगाच्या वाढीला सहाय्य करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि लाभार्थ्यांना जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मक राहण्यास सहाय्य करण्यासाठी अनेक धोरणे आणि उपक्रम राबविले जात आहेत.

  प्रदर्शित करण्यासाठी कोणतेही पोस्ट नाही

  प्रदर्शित करण्यासाठी कोणतेही पोस्ट नाही

  दस्तऐवज

  सर्व पहा

  महत्त्वाचे दुवे