1 |
महाराष्ट्र टेक्नीकल टेक्सटाईल मिशन(एमटीटीएम) ची स्थापना करणे. |
कार्यवाही पूर्ण |
केंद्र शासनाच्या टेक्नीकल टेक्सटाईल मिशनच्या (एनटीटीएम) धर्तीवर महाराष्ट्र टेक्नीकल टेक्सटाईल मिशन (एनटीटीएम) राबविणेबाबतचा शासन निर्णय दिनांक 17.01.2025 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. असे करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे. |
– |
2 |
नवी दिल्ली येथे आयोजीत भारत टेक्स-२०२५ मध्ये सहभाग घेणे. |
कार्यवाही पूर्ण |
दि.09.01.2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. नवी दिल्ली येथे दि. 14 ते 17 फेब्रुवारी, 2025 दरम्यान आयोजित भारत टेक्स-२०२५ या कार्यक्रमामध्ये राज्य शासनाने नॉलेज पार्टनर स्टेट म्हणून सहभाग घेण्यात आला आहे.
सदर कार्यक्रमामध्ये एकूण रु.360 कोटी रकमेचे सामंजस्य करार करण्यत आले. ज्याद्वारे अंदाजे 2000 रोजगार निर्माण होईल. |
– |
3 |
कॅप्टिव्ह मार्केट योजनेची अंमलबजावणी करणे. |
कार्यवाही पूर्ण |
सन 2024-25 या वर्षामध्ये सदर योजनेची अंमलबजावणी करण्यात येत असून राज्यातील सुमारे 24.50 लक्ष अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांतील माता-भगिनींना साड्यांचा लाभ देण्याचे नियोजित आहे. साड्याच्या उत्पादनाबाबत यंत्रमाग महामंडळाला आदेश दिलेले आहेत. त्यानुषंगाने दिनांक 11.04.2025 पर्यंत संपूर्ण 24.50 लक्ष साडी उत्पादन करुन पुरवठा विभागाच्या गोदामापर्यंत पुरवठा करण्यात आले आहे. |
– |
4 |
राज्याच्या एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023-28 अंतर्गत हातमाग विणकरांना प्रोत्साहन आणि सुविधा देण्यासाठी अर्बन हाट केंद्रांची स्थापना करणेबाबत योजना तयार करणे. |
कार्यवाही पूर्ण |
दिनांक 31 जानेवारी,2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये हातमाग विणकरांना प्रोत्साहन आणि सुविधा देण्यासाठी अर्बन हाट केंद्रांची स्थापना करणेबाबत प्रशासकिय मान्यता देण्यात आली आहे. |
– |
5 |
प्रसार भारती यांच्या सहकार्याने “करघा” या पारंपारिक वस्त्रोद्योग मालिकेचा पहिला भाग प्रसारीत करणे. |
कार्यवाही पूर्ण |
दिनांक १५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी दिल्ली येथे आयोजीत भारत टेक्स-२०२५ या कार्यक्रमाच्यावेळी मा. मंत्री (वस्त्रोद्योग), केंद्रीय वस्त्रोद्योग सचिव, सचिव (वस्त्रोद्योग) यांच्या उपस्थितीत “करघा” मालिकेचा हिमरु शालबाबत पहिला भाग व गीत प्रसारित करण्यात आले आहे. |
– |
६ |
टेक्नीकल टेक्सटाईल पार्कसाठी ईओआय प्रसिद्ध करणे. |
कार्यवाही पूर्ण |
दि.10.01.2025 रोजी अभिरुचीची अभिव्यक्ती (स्वारस्य अभिव्यक्ती-ईओआय) प्रसिध्द करण्यात आली. |
– |
७ |
वस्त्रोद्योग विभागाच्या योजनांचे डिजिटायझेशन आणि ऑटोमेशन करणे. (टप्पा-2 ई-टेक्स्टाइल पोर्टल व मोबाईल अप्लीकेशन |
कार्यवाही पूर्ण |
सदर पोर्टलचा दुसरा टप्पा व मोबाईल ॲप्लीकेशन तयार झाले असून दि. 05.03.2025 रोजी मा.मंत्री (वस्त्रोद्योग) यांच्या शुभहस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. मोबाईल ॲप्लीकेशन @gov.in app store वर उपलब्ध करुन देण्यासाठी सादर करण्यात आले आहे. |
– |
८ |
राज्यातील सूतगिरण्यांमध्ये प्राधान्याने सौर ऊर्जेचा वापर वाढविणे. |
कार्यवाही पूर्ण |
सूतगिरण्यांमध्ये सौरउर्जा प्रकल्प उभारतांना येणाऱ्या तांत्रिक अडचणीच्या अनुषंगाने मा. मंत्री (वस्त्रोद्योग) यांच्या अध्यक्षतेखाली ऊर्जा विभागाच्या अधिका-यासोबत दिनांक 09.04.2025 रोजी बैठक संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये मा. मंत्रीमहोदयांनी प्रस्तुत प्रकरणी अभ्यास करुन अहवाल सादर करण्याबाबत ऊर्जा विभागाला निर्देश दिलेले आहेत. |
– |
|
एकूण |
एकूण संख्या-८ |
एकूण पूर्ण कामांची संख्या-८ |
– |