उद्दिष्टे
- राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणाद्वारे निर्धारित केलेले उत्पादन, आर्थिक आणि रोजगाराचे टप्पे साध्य करणे.
- उप-क्षेत्रांवर भर देऊन या क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करणे.
- या क्षेत्राद्वारे निर्माण होणाऱ्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगानिर्मितीत वाढ करणे.
- या क्षेत्राच्या विकासासाठी आर्थिकदृष्ट्या अनुकूल, परस्परांशी जोडलेले आणि विकास केंद्रित व्यवसाय वातावरण प्रदान करणे.
- खर्च कमी करण्यासाठी आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी संपूर्ण क्षेत्रात अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि तांत्रिक उन्नतीकरणाला प्रोत्साहन देणे.
- राज्यात उत्पादित कच्च्या मालाची प्रक्रिया क्षमता वाढवणे.
- महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे आणि सर्व स्तरांवरील महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देऊन वस्त्रोद्योग क्षेत्रात महिलांना मुख्य प्रवाहात आणणे.
- कौशल्य विकास आणि क्षमता बांधणीसाठी सहाय्य प्रदान करणे आणि कुशल मनुष्यबळाची उपलब्धता सुनिश्चित करणे.
- या क्षेत्रातील गरज आधारित आणि उद्योग केंद्रित संशोधन, विकास आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देणे.
- पर्यावरणपूरक प्रक्रिया/तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे.
- या क्षेत्रातील व्यवसाय सुलभता सुनिश्चित करणे आणि सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील विद्यमान आणि संभाव्य भागधारकांसाठी एक एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देणे.
- राज्यात तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देणे आणि त्याचा विकास करणे.
- निरंतर धोरणात्मक पाठिंब्याच्या माध्यमातून पारंपरिक वस्त्रोद्योगाचे जतन करणे, प्रोत्साहन देणे आणि विकास करणे.
कार्ये
- एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023-28 ची अंमलबजावणी
- महाराष्ट्रातील वस्त्रोद्योगाच्या पुढील उप-क्षेत्रांसाठी प्रोत्साहन, अनुदाने आणि कामकाजावर देखरेख ठेवणेः
- जिनिंग आणि प्रेसिंग
- स्पिनिंग
- यंत्रमाग
- हातमाग
- प्रक्रिया
- विणकाम, होजिअरी आणि कापडनिर्मिती
- रेशीम
- पारंपारिक वस्त्रोद्योग
- लोकर
- अपारंपरिक धागे/तंतुमय आणि कृत्रिम धागे/तंतु
- तांत्रिक वस्रोद्योग
- केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना आणि कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे.
- विभागांतर्गत कार्यरत असलेल्या क्षेत्रिय घटक आणि विविध महामंडळांचे प्रशासकीय व्यवस्थापन.
- सर्व वस्रोद्योग घटकांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
- उत्तरोत्तर कागदरहित कार्यालये साध्य करणे आणि विभागातील प्रक्रिया स्वयंचलित करण्यासाठी सुयोग्य माहिती तंत्रज्ञान साधने उपलब्ध करणे.
- विभागाद्वारे घेण्यात आलेल्या पुढाकारांची विविध माध्यमांद्वारे सक्रियपणे माहिती प्रदान करणे.
- वेळोवेळी निश्चित गेलेल्या विविध क्षेत्रांमध्ये प्रमुख (Flagship) कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे.
- वस्त्रोद्योग क्षेत्रातील भागधारकांचा सहभाग वाढविण्यासाठी आय.ई.सी., परिषदा, कार्यशाळा, ऑनलाईन परिसंवाद आणि प्रदर्शनांना प्रोत्साहन देणे.